मसाप गप्पा मध्ये डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांच्यासोबत गप्पा

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आपल्या कसदार लेखनाने मराठीतील विज्ञान साहित्याचे दालन समृद्ध करणारे प्रसिद्ध लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि प्रसिद्ध लेखिका मंगला नारळीकर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका चित्रलेखा पुरंदरे संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.