जीवन समृद्ध होत जाते, तशी नात्यांची वीण घट्ट होते
मसापच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात सेंट क्रिस्पीनस होम कन्याशाळेतील विद्यार्थिनींशी मीरा शिंदे यांनी साधला संवाद !
पुणे : जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस वाढत्या वयाबरोबर अनेक नाती जोडत जातो. जीवन अनुभवसम्पन्न होत असतानाच जोडलेल्या नात्यांची वीणही अधिक घट्ट होत जाते." असे मत कवयित्री मीरा शिंदे यांनी व्यक्त केले. मसापच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत मीरा शिंदे आणि आश्लेषा महाजन यांनी सेंट क्रिस्पीनस होम कन्या शाळेतील मुलींशी संवाद साधला. याचवेळी कवयित्री आश्लेषा महाजन यांनीही गाणी-गोष्टी सांगत विद्यार्थिनींशी सं वाद साधला. व्यासपीठावर मसापचे कार्यवाह व उपक्रम समन्वयक माधव राजगुरू, दीपक करंदीकर, मुख्याध्यापक माधवी सॅमुअल, शिक्षिका संगीता कदम उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी नववीच्या पाठयपुस्तकातील मीरा शिंदे यांच्या पाठावर आधारित अनेक प्रश्न विचारले. कार्यक्रम संपल्यानंतर मुलींनी मीरा शिंदे आणि आश्लेषा महाजन यांच्याभोवती गराडा घालून प्रश्नांचा पाऊस पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. संगीता कदम यांनी आभार मानले.