मसाप आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन कार्यशाळांचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील,
१) कॉपीराईट, आय.एस.बी.एन., हार्ड बुक/ई-बुक/ऑडियो बुक प्रकाशन व ऑनलाईन वितरण(१४ ऑक्टोबर २०१८),
२) कथालेखन कसे करावे? (२८ ऑक्टोबर २०१८),
३) कादंबरीलेखन कसे करावे? (१८ नोव्हेंबर २०१८),
४) ब्लॉगलेखन कसे करावे? (२५ नोव्हेंबर २०१८),
५) गझल (०२ डिसेंबर २०१८),
६) संशोधन पद्धती आणि उपयोजन (०९ डिसेंबर २०१८),
७) अनुवाद (१६ डिसेंबर २०१८) व
८) लेखक – तंत्रज्ञान, सोशल मीडिया, युनिकोड (०६ जानेवारी २०१८)
अशा विविध विषयांवरील आठ कार्यशाळांचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत डॉ. अरूणा ढेरे, मनोहर जाधव, भारत सासणे, भाऊ तोरसेकर, मोनिका गजेंद्रगडकर, लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, मंदार जोगळेकर, दीपक शिकारपूर, हिमांशू कुलकर्णी, विवेक वेलणकर, रविंद्र शोभणे, अरूण जाखडे, सुनिताराजे पवार, प्रकाश मिसाळ, राजन लाखे, व्यंकटेश कल्याणकर, भारती पांडे, चंद्रकांत भोंजाळ, भानू काळे, वर्षा गजेंद्रगडकर, रमण रणदीवे, उमा कुलकर्णी, मंगला गोडबोले व म. भा. चव्हाण हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. क्षितिज पाटुकले म्हणाले, “ या कार्यशाळांची संपूर्ण माहिती आणि अर्ज साहित्यसेतूच्या www.sahityasetu.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे नोंदणी करून ऑनलाईन प्रवेश घेता येईल. तसेच माहिती आणि अर्ज ७०६६२५१२६२ या व्हॉटसअॅप क्रमांकावर ‘कार्यशाळा’ अथवा ‘karyashala’ असा संदेश पाठवून मागवता येईल. namaste@sahityasetu.org या पत्यावर मेल पाठवून माहिती आणि अर्ज मागवता येतील. तसेच अधिक माहितीसाठी, ७५०७२०७६४५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
अधिकाधिक भाषाप्रेमी विशेषत: युवक युवतींनी या कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मसाप आणि साहित्य सेतूच्यावतीने करण्यात आले आहे.