गदिमांचा जन्मशताब्दी निमित्त 'मसाप' तर्फे विशेष कार्यक्रम
गदिमांच्या जन्मशताब्दी निमित्त 'मसाप' तर्फे विशेष कार्यक्रम मसाप गप्पा मध्ये 'पुत्र सांगती' या कार्यक्रमात माडगूळकर बंधूंशी गप्पा

पुणे :महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मसाप गप्पा' या उपक्रमात 'पुत्र सांगती...' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगूळकर, आनंद माडगूळकर आणि शरतकुमार माडगूळकर सहभागी होऊन गदिमांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दि. ०८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.