मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही - डॉ. आशुतोष जावडेकर
‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत
मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही - डॉ. आशुतोष जावडेकर
‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत
पुणे - मराठी समीक्षक वाचकांना अजिबात महत्त्व देत नाहीत. त्यांचे वाचकांवर प्रेम नाही.अभ्यास आणि आस्वाद यांचा अंतर्भाव असलेली समीक्षा मराठीत अपवादानेच लिहिली गेलीआहे. मराठी समीक्षकांना साहित्यकृतीच्या अंतरंगापर्यंत वाचकांना घेऊन जाण्यातअजिबात स्वारस्य नाही त्यांना आपल्या तथाकथित पांडित्याचे दर्शन घडविण्यातच अधिकरस आहे. मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही. असे परखड मत लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केले. पुणे बुक फेअरमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फेआयोजित ‘वा म्हणताना- संवादः साहित्य आस्वादाचा काय वाचावं? कसं वाचावं?’ याकार्यक्रमात कवी आदित्य दवणे यांनी जावडेकर यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलतहोते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पुणे बुक फेअरचे संयोजकपी.एन.आर. राजन, कार्यवाह दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, “मराठी समीक्षकांमध्ये तरतमभाव खूप आहे. ठोकळेबाजमानसिकतेमुळे विनोदी साहित्याची आणि प्रवासवर्णनाची समीक्षा केली जात नाही.लोकप्रिय साहित्यकृतीकडे पाहण्याची समीक्षकांची दृष्टीही पूर्वग्रहदूषित आहे. पाणउताराकरण्याची संस्कृती मराठी समीक्षेत भिनलेली आहे. अभिरुचीला आव्हान देणारे काही वाचलेतरच अभिरुची समृद्ध होणार आहे. सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झालेअसले तरी अनाठायी कौतुक करणार्यांचा धोकाही वाढला आहे. संपादन करणारी व्यवस्थातिथे निर्माण होणे गरजेचे आहे. विखुरलेपणामुळे जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात एकसंधतादिसत नाही. वाचन माणसाला प्रगाढ अनुभव देते. तो अनुभव नेणिवेपर्यंत जातो. वाचनामुळेमाणसाचा दृष्टिकोन बदलतो. आजच्या काळाने वाचनावर मर्यादा आणल्या आहेत.’’ प्रा.मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभर मानले.