top of page

मसाप ब्लॉग  

कविता बदलली तरच समाज बदलेल : आमदार मेधा कुलकर्णी

मसाप मध्ये 'कविता दुर्गेच्या'कार्यक्रमात उलगडली स्त्री जाणिवेची बदलती विविध रूपे

पुणे : 'पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणे यापेक्षा कर्तृत्वाने खांदा उंच करून जगणे साहित्यात आले पाहिजे. बदलणाऱ्या जगाबरोबर कवितेतले अनुभव स्त्रीला बदलता आले पाहिजेत. कविता बदलली तरच समाज बदलेल असे मत आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कवयित्री संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी अंजली कुलकर्णी, मंदाकिनी गोडसे, उर्मिला कराड, आश्लेषा महाजन, भारती पांडे, डॉ. कांचन खैराटकर, डॉ. वर्षा तोडमल, रेखा देशमुख, योगिनी जोशी, स्वाती यादव, प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, ज्योती सरदेसाई, माधुरी गयावळ, ऋचा कर्वे, वंदना लोखंडे, चिन्मयी चिटणीस, संध्या वाघ, दीपाली दातार, रूपा बेंडे आणि मनिषा भोसले यांनी कविता सादर केल्या.कुटुंबवत्सल, ठाम, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, बदलांचा स्वीकार करणारी आणि स्त्री वादाच्या पलिकडे जाऊन माणूसपणाचा विचार करणारी अशी बदलत्या स्त्री जाणिवांची विविध रूपे साहित्य परिषदेतील 'कविता दुर्गेच्या' या कवयित्री संमेलनात उलगडली. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री प्रतिभा शाहू मोडक होत्या. मसाप कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, प्रमोद आडकर, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर यावेळी उपस्थित होते. कवयित्री आरती देवगावकर आणि श्रद्धा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, 'स्त्रियांच्या जगण्या-वागण्यात बोलण्यात बदल होत असलं तरी स्त्रीला धरणी दुभंगुन धरणीच्या पोटात घेण्याची संकल्पना अजून बदलली नाही. कवितेतून नवे बदल, नवे विचार मांडायला हवे.' शाहू मोडक म्हणाल्या, 'स्त्री ही मुळात दुर्गाच आहे पण तिच्यातील श्रेष्ठत्व पुरुषांना लवकर समजत नाही. घर सांभाळणे, मुलांवर संस्कार करणे, वेगवेगळ्या कला जोपासणे आणि सुंदर कविता लिहिणे प्रतिभेशिवाय शक्यच नाही. स्त्रीची प्रतिभा समजून घेऊन तिला प्रतिष्ठा देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. बदलाच्या लाटेत स्त्रियांनी मूल्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.'


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page