top of page

मसाप ब्लॉग  

लेखकाने संवेदनशील असणे आवश्यक - मोनिका गजेंद्रगडकर


साहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "कथालेखन कसे करावे?" या कार्यशाळेमध्ये, राज्यभरातून आलेल्या साठ नवोदित लेखकांना, डॉ. न. म. जोशी, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, मंगला गोडबोले, प्रा. क्षितिज पाटुकले, सुनिताराजे पवार, निलिमा बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले

तुम्ही संवेदनाशील आहात का ? तुम्हाला आयुष्याला भिडता येते का ? तुम्हाला माणसे वाचता येतात का ? तुम्हाला जीवनाबद्दल कुतुहल आहे का ? तुम्ही अनुभवांसाठी आसुसलेले आहात का ? कथालेखकाला वरील प्रश्न पडले पाहिजेत असे मत मोनिका गजेंद्रगडकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात व्यक्त केले.

*कथालेखन म्हणजे वृत्तांत लेखन नव्हे...!* कथालेखन हा चकवा चकवीचा खेळ आहे आणि तितकाच कारागिरीचा खेळ आहे असे मत जेष्ठ कथाकार भारत ससाणे यांनी व्यक्त केले. लेखकाला माणसांचे उत्खनन करता आले पाहिजे व कथालेखनासाठी अभ्यासाची व्यापक बैठक पाहिजे असेही

कथा निर्मिती ही रचना आहे. रचना करताना कारागिरी केली पाहिजे. मात्र ती कारागिरी केली आहे हे वाचकाला कळता काम नये. त्यातच कथेचे यश आहे. कथालेखनासाठी कथेचे तंत्र आणि मंत्र दोन्ही अवगत असले पाहिजे. कुतुहल निरिक्षण आणि चौकसपणा हा कथालेखनासाठी आवश्यक आहे.ग्रहणक्षमता, आकलनक्षमता आणि इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता हे कथालेखकांसाठी अत्यावश्यक गुण आहेत, असे मत जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात व्यक्त केले

नीलिमा बोरवणकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात सांगितले कि, सकस कथालेखनासाठी अनुभव आवश्यक आहे व अनुभव तुमच्याकडे येत नसेल तर तुम्ही अनुभवांकडे गेले पाहिजे, अनुभवांचा गुंता करणे, अनुभवांना गाठी मारणे आणि मग त्या गाठी सोडवत बसणे म्हणजे कथालेखन.

प्रा. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


कार्यशाळेत सहभागी व्यक्तींनी अभिप्राय व्यक्त करताना, कार्यशाळेचा विषय, मुद्दे व आयोजन यावर समाधान व्यक्त करीत, नवोदित लेखकांना लिखाणासाठी प्रेरणा देणारी व विविध साहित्य विषयक शंकांचे अभ्यासपूर्ण निरसन करणारी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत साहित्य सेतू व मसाप पुणे यांचे अभिनंदन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon