नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा जाहीर सत्कार समारंभ
पुणे : डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे. प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १०. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.