top of page

मसाप ब्लॉग  

मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यास

साहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 25 नोव्हेंबर 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या "ब्लॉगलेखन कसे करावे?" कार्यशाळेत पुण्यात नुकतीच " ब्लॉगलेखन कार्यशाळा" संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व वयोगटातील लोकं सहभागी झाले होते.

जेष्ठ पत्रकार *भाऊ तोरसेकर* यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ब्लॉग लिहिताना सुटसुटीत लिहिता येणं महत्त्वाचं, अलंकारिक नको. समोरचा माणूस वाचताना वेळ देत असतो ,म्हणून लिहिताना गंभीरपणा आवश्यक आहे. लिहिन्यात काही उदाहरणे, गोष्टी, दंतकथा यांचा उपयोग करावा. आपल्या ब्लॉगचं शीर्षक लक्षवेधी असावं.

साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितीज पाटुकले आपल्या मार्गदर्शन सत्रात म्हणाले की, साधं सोप्पं लिहिण हे यशस्वी लेखकाचं वैशिष्ट्य आहे. आजचा काळ वाचक काळ आहे. ब्लॉग हे व्यक्त होण्याचे एक आधुनिक , प्रतिभेच्या प्रवाहाला गती देणारे माध्यम आहे. यामुळे आता प्रत्येकाला सृजनशील निर्मिती शक्य झाली आहे. इथे लेखक आणि वाचक यांचा तात्काळ संवाद शक्य आहे. सध्या व्यवहारिक साक्षरता करण गरजेचं आहे. कोणतीही व्यक्ती, जिच्यामध्ये द्वंद, अस्वस्थता असेल ती ब्लॉग लिहू शकते. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर आपण ब्लॉग लिहू शकता. ब्लॉग लेखनातून आपण पुस्तकं, किंडल कॉपी ऑनलाईन जाहिराती

स्वतःच्या उत्पादनाची विक्री आदीद्वारे अर्थार्जन देखील करू शकतो. तुम्हाला लिहिण्याचा छंद आणि ज्ञान असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करावा. कारण आपण सगळ्यांना संधी देतो, पण स्वतःला देत नाही, स्वतःची क्षमता ओळखत नाही. मराठी ब्लॉगलेखन म्हणजे स्वतः चुका करण्याचं आणि त्या दुरुस्त करण्याचंही हक्काचं व्यासपीठ आहे.


InMarathi डॉटकॉमचे संस्थापक *ओंकार दाभाडकर* यांनी सांगितले की,

सध्या सार्वत्रिक ओरड आहे वाचन कमी होतय, पण तसं नाहीये.वाचनाची पद्धत बदलत चाललीये. वर्तमानपत्र, टीव्ही याऐवजी लोक सोशल मिडिया कडे वळाली आहेत आणि हे प्रमाण अजून वाढणार आहे हे निश्चित. तुम्ही ब्लॉग लिहिताना त्यांचा फॉरमॅट ठरवा कि कोणत्या स्वरूपाची माहिती त्यामध्ये असेल, त्याची नियमितता म्हणजे आठवड्यात किंवा दिवसाला किती वेळा ब्लॉग पोस्ट करणार ,ब्लॉगचं मार्केटिंग सोशल मिडिया, इमेल वरून करू शकता. ब्लॉग जरी मराठी असला तरी त्यातील लेखाचं नाव टाईप करताना इंग्रजी मध्ये आठवणीने करावं म्हणजे तो युजर्स कडून लवकर शोधला जाऊ शकतो. इंग्रजी साहित्य, चित्रपट याची माहिती आपण मराठी ब्लॉगवर लिहू शकता. तिकडचे लोकप्रिय चित्रपट, अभिनेते याबद्दल लिहू शकता.

ब्लॉग लेखक *व्यंकटेश कल्याणकर* आपले अनुभव सांगताना म्हणाले की,ब्लॉग लिहिण्यापूर्वी ब्लॉगचा उद्देश ठरविणे. प्रकार ठरविणे. तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे, ब्लॉग सतत अपडेट ठेवण्याची तयारी, ब्लॉगची जाहिरात करण्याची तयारी आदी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

तांत्रिक गोष्टींमध्ये ऑडीओ, आणि विडीओ संकलन शिकणे गरजेचं आहे. ब्लॉग अपडेट ठेवण्यासाठी सातत्याने लेखन आणि लेखनामध्ये बहुमाध्यमांचा वापर करावा.

ब्लॉगर म्हणून व्यावसायिकरित्या करिअर करण्याकरिता ब्लॉगलेखन कार्यशाळा ही अत्यंत उपयुक्त ठरली असे मत सहभागी व्यक्तींनी व्यक्त केले.

प्रा. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

🖋 शब्दांकन: *जया जुन्नरकर (पुणे)*, ब्लॉगलेखन कार्यशाळा सहभागी व्यक्ती.


Featured Posts
Recent Posts