महाराष्ट्र साहित्य परिषद: कार्यवाहीचा अहवाल
कार्यवाहीचा अहवाल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने तिसऱ्या वर्षातही मसापला प्रगतिपथावर नेण्यासाठी दमदार पावले टाकली त्याचा हा कार्यअहवाल
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील विशेष उपक्रम
१. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिकांना सन्मानाने दिले जावे यासाठी कार्यकारी मंडळात ठराव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ठाम भूमिका. घटनाबदलात मसापची महत्त्वपूर्ण भूमिका.
२. पु. ल. आणि गदिमा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आणि शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर साहित्य जागर
३. कादंबरीकार ह. ना. आपटे आणि राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आणि ना. सी. फडके आणि कवी गिरीश यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त विशेष कार्यक्रम.
४. मसापच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन पहिला टप्पा पूर्ण. डिजिटायझेशनसाठी ग्रंथदत्तक योजना प्रभावीपणे राबवली. कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचा ग्रंथदत्तक योजनेत महत्त्वपूर्ण सहभाग. दुर्मिळग्रंथ संकेतस्थळावर उपलब्ध.
५. साहित्य चळवळ ग्रामीण भागात पोचविण्यासाठी शिवार साहित्य संमेलनांचे आयोजन.
६. बालकुमारांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी शाखेमार्फत बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन.
७. मसाप आणि साहित्यसेतू यांच्या सहकार्याने कथा, कविता, कादंबरी, ब्लॉगलेखन, कॉपीराईट आणि लेखक , सोशल मीडिया अशा विविध कार्यशाळांचे यावर्षी आयोजन.
८. मसाप, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर येथे पहिल्या लेखक प्रकाशक संमेलनाचे यशस्वी आयोजन.
९. मसापच्या वर्धापनदिन समारंभासाठी अन्य भाषांतील साहित्यिकांना निमंत्रित करण्याची सुरु केलेली प्रथा पुढे चालू ठेवली.
१०. पुणे बुक फेअर मध्ये सहभाग आणि नवोदितांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन.
११. जेथे शाखा तेथे बैठक या निर्णयानुसार महाबळेश्वर, ठाणे, फलटण येथे बैठका.
१२. पुस्तकदिनाच्या निमित्ताने १५ मुद्रित शोधकांचा डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते सन्मान.
१३. मसापचे विभागीय साहित्य संमेलन डॉ. अभिराम भडकमकर यांच्या अध्यक्षतेखाली गुहागरला, समीक्षा संमेलन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरला, शाखा मेळावा मंगळवेढ्याला, युवा साहित्य-नाट्य संमेलन हर्षल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अंमळनेरला संपन्न, ग्रामीण भागात साहित्य चळवळ पोचविण्यासाठी 'मसाप' चे हे महत्त्वाचे वाङ्मयीन उपक्रम ग्रामीण भागात घेण्यास प्रोत्साहन.
१४. नेहमीच्या जयंती, स्मृतिदिन, व्याख्याने आणि पुरस्कार या कार्यक्रमांखेरीज मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवी एक कवयित्री यासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन. त्यातून ४५ नवे कार्यक्रम सादर झाले. साहित्यविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या सहकार्याने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन. शाळांत लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम सातत्याने सुरु.
१५. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८०% नव्या लेखक कवींना स्थान, ग्रामीण भागाला प्राधान्य.
१६. वर्षभरात ३२ शाखांना भेटी.
१७. जिल्हा प्रतिनिधींची अधिकारकक्षा वाढविली. त्यांची संमती जिल्ह्यातील नवीन शाखेच्या मंजुरीसाठी अनिवार्य केली.
१८. जिल्हा प्रतिनिधींना शाखांचे पालकत्व दिले. त्यातून शाखा सुधार, आर्थिक सबलीकरण कार्यक्रम, प्रायोजकत्व मिळवणे, वाद मिटविणे यांना गती देण्याचा प्रयत्न.
१९. शाखा सतत उपक्रमशील राहाव्यात यासाठी मसाप शाखा आणि तेथील शिक्षणसंस्थांमध्ये साहित्य-सहयोग करार घडवून आणले. त्यातून शाखा गतिमान.
२०. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक, कवींच्या सहभागासाठी जिल्ह्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जिल्हा प्रतिनिधींकडून नावे मागवून समावेश.
२१. 'पुण्याबाहेरील कार्यवाह' असा शब्दप्रगोग टाळून 'विभागीय कार्यवाह' हा शब्द रूढ केला.
या वर्षातील आजीव सभासद = ५८२
एकूण देणगी = ३, ४५,७३३/-
नव्या शाखा = १० शाखा (१. सिन्नर, २. चोपडा, ३. मंगळवेढा, ४. पारनेर, ५. भडगाव, ६.चाकण, ७. पुसेगाव, ८. चाफळ, ९. नाशिक (सिडको), १०. कर्जत (अहमदनगर).