पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार मनोविकास प्रकाशनाला

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ पुरस्कृत 'कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार' दिला जातो. यावर्षीच्या सन २०१९ च्या पुरस्कारासाठी, प्रकाशक योगेश नांदुरकर आणि चित्रकार सुरेश नावडकर यांच्या निवडसमितीने, मनोविकास प्रकाशनच्या 'ऐवजी' (नंदा खरे) या ग्रंथाची निवड केली आहे. रुपये ५०००/- स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्री. राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते, आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत लवकरच एका समारंभात प्रदान केला जाणार आहे, असे कार्यवाह बंडा जोशी यांनी कळवले आहे.