मसाप ब्लॉग  

मसापचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

April 15, 2019

 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 'भारताचे द्रष्टे समाजपुरुष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर डॉ. श्यामा घोणसे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर आणि बंडा जोशी उपस्थित होते.

डॉ. घोणसे म्हणाल्या, 'चारित्र्यसंपन्नता, शीलसंपन्नता, स्वाभिमान, प्रखर स्वदेशाभिमान ही तत्वे त्यांनी स्वतः ही आचरली व समाजाला आचरण करावयास शिकवली. त्यांनी समाजाला धम्मचक्र परिवर्तनासाठी तयार केले. समाज जोडणाऱ्या भक्कम दुव्याची भूमिका त्यांनी घेतली. जीवनात शीलाला महत्व द्यावे असे त्यांचे सांगणे होते. आज सांगितली जाणारी नदीजोड प्रकल्पाची मूळ कल्पना डॉ. बाबासाहेबांची होती. हिंदूकोड बिल हे सुद्धा त्यांच्या द्रष्टेपणाचे उदाहरण आहे. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.   

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags