लेखक, साहित्यिक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी यू ट्यूब चॅनेलची उपयुक्तता - प्रा. क्षितिज पाटुकले यांचे व

पुणे : आपली सृजनशील आणि प्रतिभाशाली निर्मिती कौशल्ये यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रकट करण्याच्या नानाविध संधी आता मराठी लेखक, कवी, साहित्यिक आणि प्रकाशक यांना उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या क्षमतांचे डिजिटल क्षमतांमध्ये रूपांतर करून यू-ट्यूब चॅनेलद्वारे त्यांना घरबसल्या सहजपणे लाखो मराठी बांधवांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. यू-ट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी आवश्यक साधने, आवश्यक डिजिटल तंत्रज्ञान, ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आणि यू-ट्यूब चॅनेलद्वारे नानाविध उत्पन्नांचे स्त्रोत कसे विकसित करायचे या विषयावर एक अभ्यासपूर्ण नि:शुल्क व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केले आहे. लेखक, यूट्यूबर आणि मसापचे समाजमाध्यम सल्लागार प्रा. क्षितिज पाटुकले हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दि. १६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
अधिकाधिक लेखक, प्रकाशक, साहित्यिक, युवक आणि रसिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.