'कथासुगंध' कार्यक्रमात डॉ. अरविंद संगमनेरकर यांच्या कथांचे अभिवाचन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात डॉ. अरविंद संगमनेरकर सहभागी होणार आहेत. त्यांच्या 'नरकात गेलेला गायनोकोलॉजिस' आणि 'ह्या हातात बाळ खेळणार नाही' या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे कलावंत करणार आहे. कथेच्या अभिवाचनानंतर कथेमागची कथा डॉ. अरविंद संगमनेरकर उलगडून दाखविणार आहेत. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि १४ मे २०१९ रोजी सायं. ६.३० वा. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.