डॉ. गणेश देवी, न्या. नरेंद्र चपळगावकर, श्रीराम पवार, डॉ. द. ता. भोसले, डॉ. अश्विनी धोंगडे, वर्षा गजे
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष वार्षिक ग्रंथ पारितोषिके दिली जातात. यावर्षी ही पारितोषिके डॉ. गणेश देवी (त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक), न्या. नरेंद्र चपळगावकर (लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक), श्रीराम पवार (मालिनी शिरोळे पारितोषिक), डॉ. द. ता. भोसले (कमल व के. पी. भागवत पारितोषिक), डॉ. अश्विनी धोंगडे (कृष्णजी कीर पारितोषिक), वर्षा गजेंद्रगडकर (अंबादास माडगूळकर स्मृती पारितोषिक), रेखा बैजल (शरश्चन्द्र चिरमुले पारितोषिक), डॉ. नीलिमा गुंडी (ह. श्री. शेणोलीकर पारितोषिक), रविराज गंधे (गणेश सरस्वती ठाकूरदेसाई पारितोषिक), डॉ. तानाजीराव चोरगे (बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल पारितोषिक), प्रा. दीपक बिचे (वासुदेव धोंडो आणि भागीरथीबाई दीक्षित पारितोषिक), संजय कळमकर (ग. ल. ठोकळ पारितोषिक), डॉ. शिरीष लांडगे आणि प्रा. रुपाली अवचरे (शरदचंद्र मनोहर भालेराव पारितोषिक), बबनराव पाटील (नी. स. गोखले पारितोषिक), उर्मिला राजेंद्र आगरकर (लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक), डॉ. चंद्रशेखर चिंगरे (राधाबाई आणि शिवाजी सावंत मृत्युंजय पारितोषिक), प्रा. दत्ता घोलप (विजया गाडगीळ पारितोषिक), सुचिता खल्लाळ (अरविंद वामन कुलकर्णी पारितोषिक), सोनाली नवांगुळ आणि गणेश घुले ( वि. वि. बोकील पारितोषिक), डॉ. नागनाथ बळते (शरदचंद्र मनोहर भालेराव पारितोषिक), डॉ. जयश्री तोडकर आणि संतोष शेणई (डॉ. पुष्पा शिरोळे पारितोषिक), विनायक कुलकर्णी (सुभाष हरी गोखले पारितोषिक), संग्राम गायकवाड (वा. म. जोशी पारितोषिक), राजीव जोशी (ज. रा. कदम पारितोषिक), सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा (स. ह. मोडक पारितोषिक), अनिलकुमार साळवे (डॉ. वि. ब. वनारसे पारितोषिक), तृप्ती उदय फळदेसाई (सावित्री आणि वासुदेव परांजपे पारितोषिक), डॉ. अनंत फडके (गीताबाई रामचंद्र महाडीक पारितोषिक), डॉ. शंतनू अभ्यंकर (विलास शंकर रानडे पारितोषिक) यांना जाहीर झाली आहेत. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते. २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात सरस्वती सन्मान प्राप्त प्रसिद्ध गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.