डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, विजया वाड, आरती कदम. किसन महाराज साखरे, सदा डुंबरे, छाया महाजन, डॉ. राजा दीक
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती कदम (रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार), डॉ. विजया वाड (ग. ह. पाटील पुरस्कार), किसन महाराज साखरे (डॉ. शं. दा. पेंडसे स्मृती पुरस्कार), दीपा भंडारे (कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती पुरस्कार), मुकुंदराज कुलकर्णी (भा. रा. तांबे पुरस्कार), जितेंद्र जोशी (ना. घ. देशपांडे पुरस्कार), मनीषा मंगल उज्जैनकर (प्रा. गो. रा. परांजपे स्मृती पुरस्कार), प्रा. डॉ. राजा दीक्षित (श्रीपाद जोशी पुरस्कार), यतिन माझिरे (कमलाकर सारंग पुरस्कार), छाया महाजन (कै. ज्योत्स्ना देवधर लेखिका पुरस्कार), सदा डुंबरे (आशा प्रभाकर संत पुरस्कार), राजीव तांबे आणि कविता मेहंदळे (कै. शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार), डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (ताईसाहेब कदम पुरस्कार) यांना देण्यात येणार आहेत. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते. २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात सरस्वती सन्मानप्राप्त प्रसिद्ध गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.