मसाप वर्धापनदिनी साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले यांचा विशेष सत्कार.

दि. २६-२७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ११३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या हस्ते साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले आणि संचालक विनायक पाटूकले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा. क्षितिज पाटूकले यांनी आपल्या साहित्य सेतू या संस्थेद्वारे मसाप पुणेचा सोशल मिडिया विकसीत केला आहे. मसापचे संकेतस्थळ, व्हॉट्सअप ग्रुप, व फेसबुक प्रोफाईल तयार केलेली आहे. त्यद्वारे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक बांधवांपर्यंत मसाप तर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नियमितपणे पोहोचवली जाते. गेल्या तीन वर्षांपासून साहित्य सेतू आपली सामाजिक साहित्यिक जबाबदारी म्हणून हे कार्य विनामूल्य करीत आहे.
मसाप सारख्या साहित्य संस्थेला तंत्रज्ञानाने युक्त बनविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल साहित्य सेतूचे विशेष अभिनंदन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.