जीएंच्या ९६ व्या जयंतीनिमित्त 'रुंग्ली रुंग्लीयॉट' जीए आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे

पुणे : आपल्या प्रतिभेने मराठी साहित्यातील कथेचे दालन श्रीमंत करणारे कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जीए कुटुंबीय यांच्या सयुंक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'रुंग्ली रुंग्लीयॉट' कार्यक्रमात जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्या पत्रांचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे करणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केले असून संगीत मंगेश धाकडे यांचे आहे. दृश्यरचना सत्यजित पटवर्धन यांची आहे. अर्भाट फिल्म्सने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले उपस्थित राहणार आहेत. जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि. १० जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह, हिराबाग चौक, टिळक रोड, पुणे येथे होणार आहे.