महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. रवींद्र भट स्मृती पुरस्कार मा. मोहनबुवा रामदासी यांना जाहीर

पुणे : कै. रवींद्र भट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी संतसाहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल एक मानाचा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा कै. रवींद्र भट स्मृती पुरस्कार मा. मोहनबुवा रामदासी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. ७५००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संतसाहित्याचे ख्यातनाम अभ्यासक मा. डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार दि. २२ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती 'मसाप' चे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.