राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ दोन व्याख्यानांचे आयोजन केले जाते. यावर्षी या व्याख्यानमालेत लेखिका आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने होणार आहेत. मंगळवार, २३ जुलै रोजी डॉ. गोऱ्हे यांचे 'स्त्री आणि समाजकारण' या विषयावर व्याख्यान होणार असून बुधवार, २४ जुलै रोजी त्या 'स्त्री आणि राजकारण' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चैतन्य बनहट्टी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहे. ही व्याख्याने मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायं. ६.१५ वाजता होणार आहेत.