लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला डॉ. सदानंद मोरे यांचे 'टिळक युग या विषयावर व्याख्

पुणे : भारतीय असंतोषाचे जनक आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावलेले परिषदेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीला १ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने पूर्वसंध्येला बुधवार दि. ३१ जुलै २०१९ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे 'टिळक युग' या विषयावर व्याख्यान होणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.