कवी अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साहित्य परिषदेत बुधवार दि. ७ ऑगस्ट २०१९ ला सभा

पुणे : प्रसिद्ध कवी आणि गजलकार अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ७ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ६ : १५ वाजता ही सभा साहित्यपरिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.