अहिताग्नी शं. रा. राजवाडे स्मृतिदिनानिमित्त श्री. मा. भावे यांचे व्याख्यान
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अहिताग्नी शं. रा. राजवाडे स्मृतिदिनानिमित्त 'अहिताग्नी राजवाडे यांनी पाहिलेले राजकारण' या विषयावार इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे.