२९ नोव्हेंबरला साहित्य परिषदेत डॉ. नीलिमा गुंडी यांचे व्याख्यान
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कवी माधव जुलियन यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्याच्या अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 'माधव जुलियन: व्यक्तित्व आणि काव्य' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान शुक्रवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६. ३० वाजता परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.