'मसाप गप्पा' मध्ये चंदू बोर्डे यांच्याशी गप्पा

पुणे : भारताचे माजी संघनायक, निवड समितीचे अध्यक्ष, भारतीय संघाचे व्यवस्थापक व उत्कृष्ठ मार्गदर्शक चंदू बोर्डे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जुन्या काळातील स्पर्धा व बदलते क्रिकेट यावर ते भाष्य करतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह व ज्येष्ठ क्रीडा समालोचक प्रकाश पायगुडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ०९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.