'मसाप गप्पा' कार्यक्रमात मीना प्रभू यांच्याशी गप्पा

पुणे : 'प्रवासवर्णन' या साहित्य प्रकारात लक्षणीय योगदान देऊन मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.