विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ६ फेब्रुवारीला 'मसाप'त श्रद्धांजली सभा

पुणे : ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. बाबा आढाव, मंगला गोडबोले, डॉ. रेखा इनामदार-साने, डॉ. नीलिमा गुंडी, मुक्ता मनोहर, सय्यदभाई, सुधीर गाडगीळ, अंजली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. ही सभा गुरुवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.