मसाप ब्लॉग  

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कॉन्टिनेन्टल पुरस्कृत चिं. वि. जोशी साहित्य पुरस्कार डॉ. सुमन नवलकर यांन


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या कॉन्टिनेन्टल पुरस्कृत चिं. वि. जोशी पुरस्कारासाठी डॉ. सुमन नवलकर (मुंबई) यांच्या 'मस्त झकास अफाट इ. इ.' या विनोदी कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुस्तकाचे प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. साहित्यिक सु. ल. खुटवड आणि संजय डोळे यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon