मसापच्या कथासुगंध या कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांच्या दीर्घकथेचे अभिवाचन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. त्यांच्या 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी करणार आहेत. कथेमागची कथा डॉ. अरुणा ढेरे उलगडणार आहेत. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.