महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. द. वा. पोतदार साहित्य पुरस्कार विनायक व विशाखा अभ्यंकर यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, ऐतिहासिक विषयावरील ग्रंथाला कै. द. वा. पोतदार पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी विनायक व विशाखा अभ्यंकर यांच्या 'झेप रणभूमीवर' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड डॉ. अरुणचंद्र पाठक आणि महेश तेंडुलकर यांच्या निवड समितीने केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे निमंत्रक म्हणून बंडा जोशी यांनी काम पाहिले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी भाषा दिनी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.