महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ८ लेखन कार्यशाळांचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मार्च ते मे २०२० अखेर ८ लेखन कार्यशाळां आयोजित केल्या आहेत.
यशस्वी व्यावसायिक लेखक कसे बनावे ? - कॉपीराईट, आय.एस.बी.एन. हार्ड बुक/किंडल ई-बुक/ऑडियो बुक प्रकाशन व ऑनलाईन पुस्तक वितरण ( ०८ मार्च ),
कथालेखन कसे करावे ? ( २२ मार्च ),
कादंबरीलेखन कसे करावे ? ( ०५ एप्रिल ),
ब्लॉगलेखन कसे करावे ? ( १९ एप्रिल ),
कविता आणि गझललेखन कसे करावे ? ( २६ एप्रिल ),
साहित्य रसग्रहण ( १० मे ),
अनुवाद कसा करावा ? ( ०३ मे ),
ऑनलाईन बुक स्टोअर (१७ मे)
अशा विविध विषयांवरील आठ कार्यशाळांचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळांमध्ये अनेक मान्यवर लेखक, साहित्यिक, ब्लॉगर, प्रकाशक मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये शिवराज गोर्ले, अतुल कहाते, प्रा. मिलिंद जोशी , प्रा. क्षितीज पाटुकले, अनिल कुलकर्णी, भारत सासणे, नीलिमा बोरवणकर, मंगला गोडबोले, राजेंद्र माने, श्याम मनोहर, राजेन्द्र खेर, संजय सोनवणी, विलास वरे, भानू काळे, भाऊ तोरसेकर, ओंकार दाभाडकर, तृप्ती कुलकर्णी, मुकुंद कुळे, राजन लाखे, अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन, म. भा. चव्हाण, नीलिमा गुंडी, डॉ. मनोहर जाधव, मुकुंद संगोराम, डॉ. सदानंद बोरसे, उमा कुलकर्णी, भारती पांडे, चेतन कोळी, अभिजीत थिटे, अॅड. कल्याणी पाठक, विनायक पाटुकले, प्रा. अनिकेत पाटील हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. क्षितिज पाटुकले म्हणाले, “गेली सलग चार वर्षे पुणे येथे मसाप आणि साहित्य सेतू या कार्यशाळा आयोजित करीत आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यशाळांमधुन मार्गदर्शन घेतलेल्या अनेक नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली. ब्लॉग सुरू झाले. युट्युब चॅनेल्स सुरू झाले. एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी मिळालेल्या विविध विषयांवरील मौलिक मार्गदर्शनामुळे साहित्यिक वाटचालीला दमदार दिशा मिळाली आहे."
या कार्यशाळांची संपूर्ण माहिती www.masapapune.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ७०६६२५१२६२ या व्हॉटसअॅप क्रमांकावर ‘कार्यशाळा’ असा संदेश पाठवून माहिती मागवता येईल. अधिक माहितीसाठी मसाप कार्यालयात आणि समन्वयक प्रा. अनिकेत पाटील (७५०७२०७६४५) यांच्याशी संपर्क साधावा.
अधिकाधिक लेखकप्रेमी, भाषाप्रेमी विशेषत: युवक युवतींनी या कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मसाप आणि साहित्य सेतूच्यावतीने करण्यात आले आहे.
