मसाप ब्लॉग  

अंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०

June 25, 2020

आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी काहीतरी दर्जेदार व वाचनीय साहित्य अंकाच्या स्वरुपात सादर करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आम्ही काही साहित्यप्रेमी एकत्र आलो. अमेरिकेत राहून सगळ्यांसाठी असेल असा एक वार्षिक अंक काढायचं ठरवलं आणि पाहतापाहता ‘निनाद’ चा पहिला वार्षिक अंक २०१९ च्या अखेरीस डेट्रॉईट, मिशिगन येथे जन्माला आला. आम्हाला लेखक आणि वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मृदुला दाढे-जोशी, संजय मोने, राहुल रानडे, वसंत लिमये, शिरीष कणेकर यांसारख्या मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन अंकासाठी लेख पाठवले. इतक्या छान प्रतिसादामुळे एका नव्या हुरूपाने आम्ही आता दुसऱ्या अंकाच्या बांधणीला सुरूवात केली आहे.
'निनाद'च्या या दुसऱ्या वर्षी आम्ही कथास्पर्धेचं आयोजन केलं आहे.


'कथास्पर्धा २०२०'... आज्जीने सांगितलेल्या चिऊ-काऊच्या, ससा-कासवाच्या गोष्टींपासून हे जग समजायला सुरुवात होते आणि आपल्याला समजलेले जग आपल्या मुला-नातवंडांना समजावून सांगताना आपणही गोष्टींचीच मदत घेतो. प्रत्येकाच्या मनात गोष्टी असतात; काही खऱ्या, तर काही रचलेल्या... तुम्ही त्या प्रभावीपणे मांडू शकता का? 'निनाद' चा मंच तुमची गोष्ट एका मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचवायला तयार आहे. त्याचबरोबर पहिल्या तीन कथांना $१००, $७५ आणि $५० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत! तुम्ही कुठल्याही देशाचे रहिवासी असलात तरी आम्हाला तुमची कथा हवी आहे.


मग उचला तुमची लेखणी आणि गुंफा शब्दफुले, एका मंत्रमुग्ध करण्याऱ्या कथेत...!
कथास्पर्धेव्यतिरिक्त तुम्ही लेख, कविता, कथा, एखादा कॉर्नर, व्यंगचित्र, शब्दकोडं पाठवू शकता. कथास्पर्धेतली कथा ही मराठी भाषेत असणं आवश्यक आहे, पण इतर साहित्य तुम्ही मराठी किंवा English मध्ये पाठवू शकता. कथास्पर्धेसाठी तुमची कथा kathaspardha@ankninad.org या email वर पाठवायची अंतिम तारीख आहे १५ जुलै, २०२०. त्याचप्रमाणे इतर साहित्य editors@ankninad.org या email वर पाठवायची अंतिम तारीख आहे १ ऑगस्ट, २०२०. अंक साधारण नोव्हेंबर २०२० च्या दरम्यान प्रकाशित होईल.


जगभरातल्या लेखकांचे उत्तमोत्तम साहित्य एकत्र आणण्याचा आमचा मानस आहे. त्यातले काही लेखक प्रथितयश असतील, तर काही लेखक भविष्यकाळात प्रथितयश होणार असतील! त्यातले काही लेखक वयाने ज्येष्ठ आणि प्रमाण भाषेत लिहिणारे असतील, तर काही अमेरिकेतले, सेकंड जनरेशनचे इंग्रजीत लिहिणारे असतील. हा अंक सगळ्या प्रकारच्या लेखकांचा असेल आणि तो सर्व प्रकारच्या वाचकांचा ठरावा, ही अपेक्षा. भाषा मराठी असली काय, किंवा नसली काय… लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची मने मराठी असतील एवढं नक्की!
अधिक माहितीसाठी भेट द्या- http://ankninad.org/  आणि   http://ankninad.org/kathaspardha/ 

 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive